Happy Dussehra

सीमोल्लंघन विजयादशमीचे 

   ओलांडू सीमा अज्ञानाच्या, प्रवेश करू या राज्यी ज्ञानाच्या ||
जिथे ना द्वेष, भेद, भय, अशा राज्यी आनंदाच्या || १ ||

शस्त्रे उचला प्रेमाची, हृदये जिंकण्या विश्वाची ||
रावण जाळू विकारांचा, स्थापना करू या रामाची || २ ||

आनंदाचा सौरभ द्यावा, प्रेमाचा जयघोष करावा ||
सुवर्ण लुटावे मानवतेचे , दारिद्र्य त्यजावे दुर्बलतेचे || ४ ||

नको हीनता , नको दीनता, नको झुकणे अन्यायापुढे ||
सामर्थ्य, शक्ती, प्रेमभक्ती, आणू राज्य श्रीरामाचे  || ५ ||

विजयादशमीस विजयी होऊ, दारिद्र्य दु:ख सोडूनी देऊ ||
आरंभ करू या नवजगाचा, विश्व कुटुंब करण्याचा || ६ ||

या सारे जोडा हात, उद्घोष करा एकतेचा ||
मानवता, विश्वप्रेम, आणिक सौहार्दाचा || ७ ||

झटू या सारे, पुन्हा एकदा भारतमातेसाठी ||
वैभव रामराज्याचे पुन्हा एकदा आणण्यासाठी || ८ ||

आम्हा ना मान्य भेदभाव तो, क्षुद्र सीमा अहंकाराच्या ||
सारे विश्वच कुटुंब आमुचे, उद्घोष हा हिंदुत्वाचा ||  
उद्घोष हा वेदांचा || ९ || 

द्वेषाच्या सीमा उभारून, वंचना स्वत: ची करू नका ||
प्रेमाच्या या राज्यापासून दूर तुम्ही राहू नका || १० ||

आनंद इथे अद्वैताचा, लवलेश न भेद भयाचा ||
विसरुनी सारे क्षुद्र विचार, स्वीकारा हा नवा आचार || ११ ||

मानवतेचा विश्वप्रेमाचा, दसरा हा हिंदुत्वाचा ||
प्रसाद घ्या सगळे हा महायोग पुर्वाभ्यासाचा || १२ || 


नारायणे दिला विश्वासाठी, प्रसाद हा सर्वांसाठी ||
मोहिनी वाटी त्यास सदा आत्मसुखासाठी || १३ ||   

अव्हेर याचा करू नका, आनंदापासुनी वंचित राहू नका || 
राम हृदयी प्रकट होण्या वाट पाहे ||
त्यास 
दूर तुम्ही लोटू नका || १४ ||

कळकळीची विनंती, ही नारायणे सर्वा केली ||
अनुसरण तिचे सदा करा, प्राणपूजा ही सदा करा  || १५  || 

हृदयी ध्यास हाच धरा, प्राण माझा सखा खरा ||
प्राणपूजा हीच विश्वपूजा, आरंभ तिचा आज करा || १६ || 

आरंभ तिचा आज करा ||
आरंभ तिचा आज करा ||

    

Comments

 1. This post is in Marathi.I am trying to post the datailed meaning in English soon.

  ReplyDelete
 2. दशहरा का तात्पर्य, सदा सत्य की जीत।
  गढ़ टूटेगा झूठ का, करें सत्य से प्रीत॥

  सच्चाई की राह पर, लाख बिछे हों शूल।
  बिना रुके चलते रहें, शूल बनेंगे फूल॥


  क्रोध, कपट, कटुता, कलह, चुगली अत्याचार
  दगा, द्वेष, अन्याय, छल, रावण का परिवार॥

  राम चिरंतन चेतना, राम सनातन सत्य।
  रावण वैर-विकार है, रावण है दुष्कृत्य॥

  वर्तमान का दशानन, यानी भ्रष्टाचार।
  दशहरा पर करें, हम इसका संहार॥

  ReplyDelete
 3. Bahut Bahut Aabhar, Aadarneey Shrikrishnaji, Satya aur Yatharth Vachan.

  ReplyDelete